...तर १९९९ साली छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले असते: अजित पवार

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या पंच्याहत्तरीच्या निमित्ताने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
...तर १९९९ साली छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले असते: अजित पवार

"एखाद्या गोष्टीत लक्ष घालून जीव ओतून काम करणे हा छगन भुजबळ यांचा स्वभाव आहे. ओबीसी बांधवांच्या आरक्षणाच्या हक्कासाठी स्वतःची राजकीय कारकीर्द आणि जीवन धोक्यात टाकण्याची जोखीम त्यांनी पत्करलेली होती. याची नोंद या निमित्ताने आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. १० जून १९९९ ला ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्याच्यानंतर खरंतर लगेच निवडणुका झाल्या. सहा महिने आधी निवडणुका घेतल्या. भुजबळांनी आणि बाकीच्या सगळ्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. त्यानंतर आघाडीची सत्ता आली त्यात त्यांनी उपमुख्यमंत्रीपद त्यांनी भूषविले. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या तोडीस तोड काम करून दाखवलं. आम्हाला १९९९ साली आणखी चार महिने मिळाले असते तर छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले असते", असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या पंच्याहत्तरीच्या निमित्ताने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.

“राज्यात आघाडीचे सरकार वाचविण्यासाठी छगन भुजबळ यांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. छगन भुजबळ हे लढाऊवृत्ती संकटांना न डगमगणार संकटावर मात करणारे नेतृत्व आहे"असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in