...तर राष्ट्रवादी पक्षात परत सक्रिय होईन - खडसे

भाजपमध्ये प्रवेश केला आहे पण राज्याला मान्य नाही. राष्ट्रवादीचा राजीनामा दिलेला आहे पण मंजूर झालेला नाही.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

जळगाव : भाजपमध्ये प्रवेश केला आहे पण राज्याला मान्य नाही. राष्ट्रवादीचा राजीनामा दिलेला आहे पण मंजूर झालेला नाही. भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा आहे, काही दिवस वाट पाहीन, अन्यथा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच राहून पक्षात अधिक सक्रिय होईन असे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलतांना आण नेमके कोठे यावर स्पष्टपणे भाष्य केले. मंगळवारी एकनाथ खडसेंचा वाढदिवस होता. शुभेच्छा देणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. नाथाभाऊ नेमके कोठे जातात ही याबबतची प्रतीक्षा सगळ्यांना आहे, खडसेंनी यावर स्पष्टपणे भाष्य केले.

एकनाथ खडसे हे ४० वर्ष भाजपमध्ये होते. ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदारही होते. मध्यंतरीच्या काळात भाजपशी झालेल्या मतभेदातून त्यांनी पक्षाचा राजीनामा देत शरद पवार यांच्या नेत्रुत्वाखालील राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला, मात्र ते रमले नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत दिल्लीत भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा, विनोद तावडे, रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला पण राज्यातील नेत्यांना तो मान्य नाही. त्यामुळे खडसे सध्या कोठे हा सवाल विचारला जात होता. भापाकडून चांगला प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे राजकीय भवितव्यासाठी काहीतरी निर्णय मला घेणे भाग आहे, असे सांगत प्रवेश न झाल्यास राष्ट्रवादीतच राहणार असे स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in