...तर मी राजकारण सोडून देईन; विरोधकांच्या आरोपांवर अजित पवार यांचे प्रत्युत्तर

नाशिक इथे पत्रकारांशी अजित पवार यांनी संवाद साधला. त्यावेळी अजित पवार म्हणाले की, मी गेले ५-६ दिवस माध्यमांत बघतोय, पेपर वाचतोय, राजकीय लोकांनीही विधानं केलीत.
...तर मी राजकारण सोडून देईन; विरोधकांच्या आरोपांवर अजित पवार यांचे प्रत्युत्तर
Published on

मुंबई : "माझी बदनामी करणं, सातत्याने गैरसमज निर्माण करणं असा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय. ज्यांनी कुठलाही पुरावा नसताना संसदेपासून इथपर्यंत माझ्यावर वेश बदलून प्रवास केल्याचे आरोप केलेत. त्यांनी हे आरोप सिद्ध करावेत. हे आरोप सिद्ध झाले, तर मी राजकारण सोडेन," असे विधान करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

नाशिक इथे पत्रकारांशी अजित पवार यांनी संवाद साधला. त्यावेळी अजित पवार म्हणाले की, मी गेले ५-६ दिवस माध्यमांत बघतोय, पेपर वाचतोय, राजकीय लोकांनीही विधानं केलीत. अजित पवार वेश बदलून दिल्लीला जायचे. हे सर्व धादांत खोटे आहे. हे बदनामी करण्याचं काम सुरू आहे. माझ्याबाबत गैरसमज निर्माण करण्याचे काम आहे. आरोप करण्याआधी माहिती घ्या. मी ३५ वर्ष काही काळ विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री आणि मंत्री, आमदार म्हणून जबाबदारी मलाही कळते. नाव बदलून प्रवास करणं हा गुन्हा आहे. सगळीकडे सीसीटीव्ही आहेत. खुशाल कुणी बहुरूपी म्हणतंय आणखी कुणी काही म्हणतंय. म्हणणाऱ्यांना काही लाजलज्जा शरम वाटली पाहिजे. धादांत बिनबुडाचे आरोप केले जातायेत त्यात काहीही सत्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in