...तर कोऱ्या कागदावर राजीनामा देतो! मंगलप्रभात लोढा यांनी ठणकावले

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मंगलप्रभात लोढा यांची पाठराखण करताना सांगितले, “या आधी मंगलप्रभात लोढा यांना विचारायचो की, तुम्ही एसआरएची कामे का घेत नाहीत.
...तर कोऱ्या कागदावर राजीनामा देतो! मंगलप्रभात लोढा यांनी ठणकावले

नागपूर : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देताना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आपण कोणतेही चुकीचे काम करत नसल्याचे सांगत आरोप करायचे असतील तर पुरावे सादर करण्याचे थेट आव्हान दिले. अंबादास दानवे यांनी सभागृहात बोलताना पुराव्याशिवाय आरोप केल्यानंतर, काही चुकीचं केलं असेल तर थेट कोऱ्या कागदावर सही करून राजीनामा देत असल्याचं मंगलप्रभात लोढा यांनी जाहीर केलं.

मंत्री लोढा म्हणाले, “मी अनेक वर्षांपासून माझ्या कुटुंबाच्या व्यवसायात नाही. जर माझ्या कुटुंबियांकडून अवैध व्यवसाय होत असेल तर मी कोऱ्या चिठ्ठीवर सही करून राजीनामा लिहून देतो. आम्ही एकही अनधिकृत बांधकाम केले नाही. आम्ही अनधिकृत व्यवसाय करत नाही. पदाचा मी गैरवापर करत नाही. तुम्ही पुरावे द्या, ते घेण्यासाठी मी स्वत: येतो. हे जे काही चाललंय ते बरोबर नाही. कोणाच्या कुटुंबाने व्यवसाय, नोकरी काही करायचाच नाही का? बेरोजगार बसून राहायचा का? माझं काम अतिशय पारदर्शक आहे, कुणी एका रुपयाचा माझ्यावर आक्षेप घेऊ शकत नाही. मंत्रीपदावर असतानादेखील मी कोणताही व्यक्तिगत फायदा घेतलेला नाही.”

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मंगलप्रभात लोढा यांची पाठराखण करताना सांगितले, “या आधी मंगलप्रभात लोढा यांना विचारायचो की, तुम्ही एसआरएची कामे का घेत नाहीत. तेव्हा लोढा यांनी स्पष्ट केले होते की, सरकारकडून कोणतेही प्रकल्प मला नकोत. माझ्या नावावर एक रुपयाचादेखील डाग लागला नाही पाहिजे. ही काळजी मी घेतो असे लोढा म्हणाले होते.”

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in