"...तर सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल", मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

आज नांदेड जिल्ह्यात पाच ठिकाणी मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
 "...तर सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल", मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शब्द दिला होता ,त्यामुळे आज हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांना मराठा आरक्षणावर चर्चा करावीच लागेल. त्यामध्ये सर्व पक्षाचे आमदार एकत्र होऊन मराठा आरक्षण कायदा देण्यासाठी एकत्र होतील. असा विश्वास मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी वक्त केला आहे.

आज नांदेड जिल्ह्यात पाच ठिकाणी जरांगे यांच्या सभेचं आयोजन केलं आहे. आज सकाळी जिजाऊनगर येथील सभा पार पडल्यानंतर पत्रकाराकारांशी बोलताना ते म्हणाले की, आम्ही मराठा आणि कुणबी एकच आहोत. त्यामुळे राज्यात ३० लाखाहून अधिक कुणबी प्रमाणपत्र आढळली आहेत. त्यामुळे शासनाने आता अधिक वेळ न घालवता मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा. कोण काय बोलत आहे? कोणाची काय भूमिका आहे? त्या पेक्षा पुरावे महत्वाचे आहेत. आम्ही कोणच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देत नाही, पण कोणी मध्ये येत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही, हा मराठ्यांचा इतिहास आहे.

मराठा आरक्षण आंदोलन दरम्यान, ज्या आंदोलकांवरती गुन्हा दाखल झाला आहे. तो गुन्हा मागे घेणायचा आणि त्याना अटक न करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. पण ते पाळले गेले नाही तर त्याची किंमत देखील सरकारला मोजावी लागेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in