...तर मंडल आयोगाला आव्हान देऊ -जरांगे

मनोज जरांगे-पाटील गुरुवारी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत
...तर मंडल आयोगाला आव्हान देऊ -जरांगे

नाशिक : मंडल आयोगाला आव्हान देण्याची आमची इच्छा नाही. पण, भुजबळांनी तीन वेळा विरोध केला, आता चौथ्यांदा केल्यास मंडल आयोगाला नक्की आव्हान देणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी गुरुवारी भुजबळांच्या बालेकिल्ल्यात दिला. भुजबळ हे राजीनामा देणारे नसून दुसऱ्यांचा राजीनामा घेणारे आहेत. त्यांच्या इतक्या खालच्या दर्जाचा मी नाही. असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. मनोज जरांगे-पाटील गुरुवारी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. ते दिंडोरी, कळवण, बागलाण, मालेगाव, नांदगाव येथे भेट देणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in