शिवसेनेमधील गळती थांबण्याचे चिन्ह अजून काही दिसेनात... रामदास कदम यांचे 'हे' पत्र

यापूर्वी कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश गुवाहाटी येथील शिंदे छावणीत दाखल झाले
शिवसेनेमधील गळती थांबण्याचे चिन्ह अजून काही दिसेनात... रामदास कदम यांचे 'हे' पत्र

शिवसेनेच्या आमदारांना हाताशी धरून एकनाथ शिंदे यांनी गट स्थापन केल्यानंतर सरकारदेखील बनवले. मात्र शिवसेनेमधील गळती थांबण्याचे चिन्ह अजून काही दिसेनात. एक एक करून मोठं मोठे पदाधिकारी ते कार्यकर्ते, नेते मंडळी अजूनदेखील शिवसेनेला सोडचिट्ठी देत शिंदे गटामध्ये सामील होत आहेत. त्यामध्येच भर म्हणजे आता शिवसेनेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. असंतुष्ट शिवसेना नेते रामदास कदम शिवसेना सोडणार असल्याचे वृत्त नुकतंच समोर येत आहे. कदम हे माजी विरोधी पक्षनेते आणि माजी मंत्री आहेत. रामदास कदम हे लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी राजीनामा पाठवणार असल्याचं बोललं जात आहे. यापूर्वी कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश गुवाहाटी येथील शिंदे छावणीत दाखल झाले होते.

रामदास कदम येत्या 2 दिवसांत पत्रकार परिषद घेऊन आपली सविस्तर भूमिका मांडणार आहेत. शिवसेना नेत्यांचे राजीनाम्याचे सत्र सुरूच आहे, काही दिवसांपूर्वी आनंदराव अडसूळ यांनी नेतेपदाचा राजीनामा दिला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in