सरकारपुढेही काही मर्यादा....मुख्यमंत्र्यांनी दिली इर्शाळवाडी दुर्घटनेची माहिती

या ठिकाणी अजूनही बचावकार्य सुरु असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं
 सरकारपुढेही काही मर्यादा....मुख्यमंत्र्यांनी दिली इर्शाळवाडी दुर्घटनेची माहिती

बुधवारी रात्री इर्शाळवाडीत दरड कोसळून अख्खं गाव त्याखाली दबलं गेलं. या दुर्घटनेत आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ११९ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर आठ जण यात जखमी झाले आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.

यावेळी बोलताना त्यांनी सतत पडणारा पाऊस, चिखल आणि धुके यामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी त्याठिकाणी जाऊन बचावकार्याचा आढावा घेतला. त्याठिकाणी अजून काही लोक अडकण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या यंत्रणांसोबत अन्य स्वयंसेवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी देखील बचावकार्यात मदत केली. गुरुवारी दिवसभरात एकूण ११९ लोकांना वाचवण्यात यश आलं. ही नैसर्गिक आपत्ती असल्याने राज्य सरकारपूढे काही मर्यादा आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत २० जणांनी आपले प्राण गमावले असून ८ जण जखमी झाले आहेत. या घटनेत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्यात येत आहे. असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

घटना घडल्यापासून दोन तासांच्याता आत आपली यंत्रणा त्याठिकाणी पोहचली. आजही याठिकाणी बचाव कार्यसुरु असून लोकांना धिर देण्याचा प्रयत्न सुरु आहे. मंत्री गिरीश महाजनाचे विशेष काम आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी याठिकाणी राहून विशेष लक्ष देत आढावा घेतल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. इर्शाळवाडीत कंटेनर मागवण्यात येत असून जोपर्यंत त्यांची कायमस्वरुपी सोय होत नाही तोपर्यंत त्यांना मदत केली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबतचे आदेश दिले आहेत. सीडकोला त्या ठिकाणी लोकांना कायमस्वरुपी घरं बांधण्याचा आदेश दिला आहे. या लोकांना सर्वत्या सोई उपलब्ल करुन देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in