राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

पुढील दोन दिवस राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता...
राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
Published on

पुणे : पुढील दोन दिवस राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. यामध्ये शनिवारी (दि.१०) आणि रविवारी (दि.११) विदर्भ आणि मराठावाड्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या संदर्भातील माहिती पुणे हवामान विभागाने दिले आहे.

पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख. डॉ. के. एस होसाळीकर यांनी राज्यात पावसाचा अंदाज वर्तवणारी माहिती त्यांच्या एक्स अकाऊंटवरून दिली आहे. शनिवारी कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सोबत वादळी वारे ३०-४० किमी प्रति तास वेगाने वाहणार असल्याचेदेखील डॉ. होसाळीकर यांनी म्हटले आहे. मराठवाड्यातील जालना, हिंगोली आणि परभणी येथे वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचेही त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात कोकण वगळता उर्वरित राज्यातील काही भागांत शुक्रवारी आणि शनिवारी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, राज्यातील किमान व कमाल तापमानात 3 ते 5 अंशांनी वाढ झाली आहे. उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. त्या भागात पश्चिमी चक्रवाताचा जोर कायम आहे. मात्र, महाराष्ट्रात तापमानवाढीस सुरुवात झाली आहे. दोन दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे.

logo
marathi.freepressjournal.in