Mumbai-Pune Expressway ने प्रवास करताय? 'या' वेळेत आहे दोन तासांचा ब्लॉक

या कालावधीत प्रवाशांनी मुंबई आणि पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ५५ किमी किलोमीटरच्या लेनवर डायव्हर्जन पॉइंट तयार केला आहे.
Mumbai-Pune Expressway ने प्रवास करताय? 'या' वेळेत आहे दोन तासांचा ब्लॉक

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) आज मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दुपारी १२ वाजल्यापासून ते २ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळेत एक्सप्रेस वे हा लहान-मोठे वाहन आणि अवजड वाहनांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

या कालावधीत मुंबई आणि पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ५५ किमी किलोमीटरच्या लेनवर डायव्हर्जन पॉइंट तयार केला आहे. प्रवाशांनी ड्रायव्हर्जन पॉइंटवरून त्यांची वाहने वळवावी. तसेच जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचा वापर करून पुणे राष्ट्रीय महामार्ग ४८, खोपोलीपासून प्रवाशांना शेडुंग टोल प्लाझावरून सोडले जाईल.

या कामासाठी घेतला २ तासांचा ब्लॉक

पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर १९.१०० किलोमीटर अंतरावर गॅन्ट्री बसवण्याचे काम केले जाणार आहे. यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. प्रवाशांनी त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in