लोकसभेच्या तोंडावर आणखी एक राजकीय भूकंप होणार, अनेक आमदार महायुतीत येणार- अमोल मिटकरी

राज्यात अदयापही महत्वाच्या राजकीय घडामोडी घडणे बाकी आहे. येत्या लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) मधील अनेक आमदार महायुतीत येणार असल्याचा खळबळजनक दावा
लोकसभेच्या तोंडावर आणखी एक राजकीय भूकंप होणार, अनेक आमदार महायुतीत येणार- अमोल मिटकरी

प्रतिनिधी/मुंबई

राज्यात अदयापही महत्वाच्या राजकीय घडामोडी घडणे बाकी आहे. येत्या लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) मधील अनेक आमदार महायुतीत येणार असल्याचा खळबळजनक दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेत़त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. आताच पक्षप्रवेश झाला तर त्यांना त्यांच्या पक्षातील वरिष्ठांकडून त्रास होऊ शकतो. त्यामुळे लोकसभेच्या ऐन तोंडावर हा राजकीय भूकंप होईल, असेही अमोल मिटकरी म्हणाले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपाने राज्यसभेवर पाठविले आहे. त्याआधी मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या गटातील अनेक नेते आणि आमदार लवकरच महायुतीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. शरद पवार गटाचे एक वरिष्ठ नेते लवकरच अजित पवार यांच्याकडे जाणार असल्याच्या चर्चाही जोरात आहेत.

या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. यातील काही आमदारांनी आमच्या वरिष्ठ नेत्यांची भेट देखील घेतल्याचे अमोल मिटकरी म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या आधी हे आमदार त्यांचा पक्ष सोडतील असेही मिटकरी म्हणाले.

दहा जागांची मागणी

लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाकडे आमची दहा जागांची मागणी आहे. लोकसभेसाठी चार जागांवर आमची बोळवण होणार नाही. अजितदादांची जिथे ताकद आहे तिथे आम्हाला लढायला संधी मिळेल व त्या सर्व जागा आम्ही जिंकू. योगेंद्र पवार असो वा जोगेंद्र असो त्यांच्या पक्षप्रवेशाचा काही परिणाम होणार नाही. योगेंद्र पवार यांचे नाव आज जनतेने ऐकले आहे, असेही अमोल मिटकरी म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in