रेडी रेकनरच्या दरात वाढ होणार नाही! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही

डी रेकनर दरासंदर्भात सध्या संपूर्ण राज्यात सर्वेक्षण सुरू आहे. मागील काही वर्षांमध्ये काही भागांमध्ये रेडी रेकनर दर वाढले.
चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रशेखर बावनकुळेसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : रेडी रेकनर दरासंदर्भात सध्या संपूर्ण राज्यात सर्वेक्षण सुरू आहे. मागील काही वर्षांमध्ये काही भागांमध्ये रेडी रेकनर दर वाढले. तर काही ठिकाणी दर स्थिर ठेवण्यात आले. २०२३-२४ आणि २०२४-२५ मध्ये कोणतीही दरवाढ झालेली नाही. १०-१५ टक्के दरवाढ होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, मात्र त्या निराधार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

विधानपरिषद सदस्य सुनील शिंदे, ॲड. अनिल परब, सचिन अहिर यांनी मालमत्तांच्या खरेदी विक्री वेळी जमा होणाऱ्या मुद्रांक शुल्क संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. राज्याच्या कोणत्याही भागात तडकाफडकी दरवाढ करण्याचा शासनाचा कोणताही हेतू नसून राज्यात दर ठरवताना स्थानिक परिस्थिती, विकास दर आणि मागणी-पुरवठा यासारख्या घटकांचा विचार केला जातो. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे, ज्या स्थानिक लोकप्रतिनिधी आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दर निश्चित करतात. यामध्ये गरजेनुसार काही दर कमी करण्याचा विचारही केला जातो, असे बावनकुळे यांनी सांगितले.

दर कमी करण्याचा विचार – महसूल मंत्री

राज्य सरकार जनतेच्या तक्रारी आणि सूचना गांभीर्याने घेत असून ९ जानेवारी २०२५ रोजी या संदर्भात बैठक झाली आहे. १ एप्रिलपूर्वी कोणालाही सूचना द्यायच्या असतील तर त्या सरकारकडे मांडाव्यात, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. शासन कोणत्याही भागात अवाजवी दरवाढ करणार नाही. तसेच गरज असल्यास काही दर कमी करण्याचाही विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in