सोने खरेदीला म्हणून आले, अन् तेच चोरून पळाले

याबाबत मंगळवार ५ सप्टेंबर रोजी उशिरा उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोने खरेदीला म्हणून आले, अन् तेच चोरून पळाले

कराड : बाळाच्या बारशासाठी सोन्याची अंगठी व कानातील डुले आदी सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या एका अज्ञाताने ५ लाख २० हजार रूपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली असल्याची घटना गेल्या १२ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली होती.मात्र याबाबत मंगळवार ५ सप्टेंबर रोजी उशिरा उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विलास पाटील (रा.उंब्रज) यांनी फिर्याद दिली आहे. मात्र तब्बल तीन आठवड्यानंतर फिर्यादीने फिर्याद दिल्याने याबाबत उंब्रज परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. याबाबत विलास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,उंब्रज येथे एचडीएफसी बँकेशेजारी असलेल्या श्रीकृष्ण चैतन्य ज्वेलर्स या सोन्या चांदीच्या दुकानात एक अनोळखी इसम आला. बाळाच्या बारश्यासाठी सोन्याची अंगठी व कानातील डुले आदी सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात येऊन दुकानातील ड्रॉव्हरमधून सोन्याचे दागिने ठेवलेला प्लास्टीकचा पारदर्शक बॉक्स हातचलाखीने चोरुन नेला.

logo
marathi.freepressjournal.in