विधीमंडळ अधिवेशनापूर्वी महायुतीचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार? कुणाची लागणार वर्णी, कुणाचा पत्ता कट?

महायुतीच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार, कुणाचा पत्ता कट होणार आणि कुणाची खाती बदलली जाणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
विधीमंडळ अधिवेशनापूर्वी महायुतीचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार? कुणाची लागणार वर्णी, कुणाचा पत्ता कट?
Published on

मुंबई: राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन २७ जूनला सुरु होतंय. दरम्यान पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूकीत सपाटून मार खाल्लानंतर विधानसभा निवडणूकीला सामोरं जाण्यापूर्वी महायुतीकडून होणाऱ्या या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्व राजकीय विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार, कुणाचा पत्ता कट होणार आणि कुणाची खाती बदलली जाणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

या आमदारांना मिळू शकते मंत्रिपदाची संधी-

सुत्रांच्या माहितीनुसार , भाजपकडून गणेश नाईक (ऐरोली), नितेश राणे (कणकवली), माधुरी मिसाळ (पर्वती), शिवेंद्रराजे भोसले (सातारा), अतुल भातखळखर (कांदिवली), राणा जगजितसिंह पाटील (तुळजापूर), संभाजी पाटील निलंगेकर (निलंगा), सुरेश धस (विधानपरिषद) या आमदारांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून संजय शिरसाट (संभाजीनगर), आशिष जैसवाल (रामटेक), भरत गोगावले (महाड) यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून संग्राम जगताप (नगर) आणि अण्णा बनसोड (पिंपरी) यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते. विशेष म्हणजे यवतमाळच्या माजी खासदार भावना गवळी यांना मंत्रिपद मिळू शकतं, अशी चर्चा आहे. भावना गवळींना विधानपरिषदेवर घेऊन त्यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं, असं बोललं जात आहे.

याशिवाय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची खाती बदलली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचं मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान प्रमोशन होऊ शकतं.

राज्यविधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन २७ जूनला सुरु होतंय. त्याआधीच तिसरा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूकीत सपाटून मार खाल्लानंतर विधानसभा निवडणूकीला सामोरं जाण्यापूर्वी महायुतीकडून होणाऱ्या या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्व राजकीय विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार, कुणाचा पत्ता कट होणार आणि कुणाची खाती बदलली जातील, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

या आमदारांना मिळू शकते मंत्रिपदाची संधी-

सुत्रांच्या माहितीनुसार मंत्रिपदासाठी भाजपकडून गणेश नाईक (ऐरोली नवी), नितेश राणे (कणकवली),माधुरी मिसाळ (पर्वती, शिवेंद्रराजे भोसले (सातारा), अतुल भातखळखर (कांदिवली), राणा जगजितसिंह पाटील (तुळजापूर), संभाजी पाटील निलंगेकर (निलंगा), सुरेश धस (विधानपरिषद) या आमदारांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून संजय शिरसाट (संभाजीनगर), आशिष जैसवाल (रामटेक), भरत गोगावले (महाड) यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून संग्राम जगताप (नगर)आणि अण्णा बनसोड (पिंपरी) यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते.

याशिवाय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची खाती बदलली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचं मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान प्रमोशन होऊ शकतं.

तिसरं वर्ष, तिसरा मंत्रिमंडळ विस्तार-

एकनाथ शिंदे शिवसेना पक्षातील काही आमदारांना सोबत घेऊन भाजपला येऊन मिळाले. त्यानंतर ३० जून २०२२ रोजी महायुतीचं सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तिथून पुढचे ४० दिवस हे दोघेच मंत्री होते. त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. यामध्ये शिवसेना आणि भाजपच्या प्रत्येकी ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर २ जुलै २०२३ रोजी दुसरा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली.

शिंदे-फडणवीसांकडं १२ खाती-

सध्या एकनाथ शिंदेंकडे ७ खाती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं ५ खाती आहेत. मुख्यमंत्री शिंदेंकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण, माहिती तंत्रज्ञान, माहिती-जनसंपर्क अशी ७ खाती आहेत. तर गृह, जलसंपदा, विधी व न्याय, ऊर्जा, राजशिष्टाचार अशी ५ खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं आहेत.

एकनाथ शिंदे शिवसेना पक्षातील काही आमदारांना सोबत घेऊन भाजपला येऊन मिळाले. त्यानंतर ३० जून २०२२ रोजी महायुतीचं सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तिथून पुढचे ४० दिवस हे दोघेच मंत्री होते. त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. यामध्ये शिवसेना आणि भाजपच्या प्रत्येकी ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर २ जुलै २०२३ रोजी दुसरा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर आता विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी तिसरा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो.

शिंदे-फडणवीसांकडं १२ खाती-

सध्या एकनाथ शिंदेंकडे ७ खाती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं ५ खाती आहेत. मुख्यमंत्री शिंदेंकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण, माहिती तंत्रज्ञान, माहिती-जनसंपर्क अशी ७ खाती आहेत. तर गृह, जलसंपदा, विधी व न्याय, ऊर्जा, राजशिष्टाचार अशी ५ खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं आहेत.

logo
marathi.freepressjournal.in