हा थोड्या दिवसाचा खेळ आहे. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच - आदित्य ठाकरे

महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणून काम केले. त्याचवेळी अजित पवार
File Photo
File Photo

आज मुंबईतील बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' बैठक होत आहे. या बैठकीत ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार काय बोलणार? याकडे साऱ्यांचं लक्ष होते. दरम्यान, ठाकरे गटनेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर चांगलीच टीका केली आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे ?

हे सरकार कोसळणार असल्याचं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी आज पुन्हा एकदा आपल्या भाषणामधून केले. महाराष्ट्राला यातून बाहेर काढायचे आहे. महाराष्ट्राला सुवर्णयुगात घेऊन जायचे आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणून काम केले. त्याचवेळी अजित पवार, बाळासाहेब थोरात यांसारखे नेते आम्ही सर्वजण एक मजबूत टीम म्हणून काम करत होतो. आपण मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक राज्यात आणू शकलो. ही आपल्या महाविकास आघाडीची ताकद होती. त्या अडीच वर्षांत राज्यात कुठेही दंगल झाली नाही, कुठेही भेदभाव झाला नाही. प्रत्येक आमदार आपल्या विधानसभेत शेतकरी, तरुण आणि महिलांची काळजी घेऊन काम करत होता. आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घटनाबाह्य सरकार बसले आहे. मी लिहून देतो की हा थोड्य दिवसाचा खेळ आहे. हे सरकार कोसळणारच ..."

logo
marathi.freepressjournal.in