हा गोदावरी अर्बनचा नव्हे, ग्राहकांच्या बांधिलकीचा सोहळा

हा गोदावरी अर्बनचा नव्हे, ग्राहकांच्या बांधिलकीचा सोहळा

राजश्री पाटील : सहकारसूर्य मुख्यालयात गोदावरी टॉक शो संपन्न

नांदेड : गोदावरी अर्बन संस्थेने आजपर्यंत सहकार क्षेत्रातील सर्व निकषांचे पालन करत संस्थेच्या माध्यमातुन समाजातील सर्वसामान्य घटकापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि आजही तो सुरुच आहे. सहकार क्षेत्रात काम करीत असतांना कायम सामाजिक भान जपलं पाहिजे, असा आग्रह आमचे मार्गदर्शक संस्थापक खासदार हेमंत पाटील साहेबांचा असतो. त्याला अनुसरून गोदावरी परिवार सामाजिक उत्तरदायित्व निभावण्याचे काम करीत गेल्या दहा दिवसांपासून सर्व शाखांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविले गेले. हा गोदावरी अर्बनचा नव्हे, तर ग्राहकांच्या विश्वास आणि बांधिलकीची दशकपूर्ती सोहळा असल्याचे वक्तव्य गोदावरी अर्बन संस्थेच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांनी येथे केले.

गोदावरी अर्बन संस्थेच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने शनिवारी (दि.१५) तरोडा नाका परीसरातील सहकारसूर्य मुख्यालयात टॉक शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या प्रमुख म्हणून बोलत होत्या. या प्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, संस्थेचे सचिव ॲड. रवींद्र रगटे, संचालक प्रा. सुरेश काटकमवार, वसंत सहकारी कारखान्याचे अध्यक्ष अजयजी देशमुख, कलंबर साखर कारखान्याचे अध्यक्ष सदाशिव पुंड, संस्थेचे संचालक वर्षाताई देशमुख, प्रसाद पाटील महल्ले, यशवंत सावंत, मुख्यालयाचे प्रिंसिपल मॅनेजर विजय शिरमेवार, गोदावरी अर्बनच्या मुख्य शाखेचे शाखाधिकारी अविनाश बोचरे, चिखलवाडी शाखेचे गुरु तेजसिंग चिरागिया, यांची उपस्थिती होती.

राजश्री पाटील म्हणाल्या की, गोदावरी अर्बनने आजपर्यंत केलेल्या वाटचालीचे सर्व श्रेय आमच्यावर विश्वास दाखवणाऱ्या असंख्य सभासद, ग्राहकांना जाते आणि एकनिष्ठेने काम करून ज्यांनी गोदावरी अर्बनचे कार्य समाजात पोहचवली त्या सर्व कर्मचाऱ्यांच आहे. लवकरच गोदावरी अर्बन एक ऐतिहासिक आकडा पार करणार असून, या पुढील वाटचालीत देखील आपल्या सर्वांचे सहकार्य, आशीर्वाद आणि विश्वास कायम राहील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त करताना गोदावरी अर्बनला गोवा राज्यात शाखा उघडण्याची परवानगी मिळाली ही गोदावरी परीवारासाठीच नव्हे, तर ठेविदार, ग्राहकांसाठी आनंदाची गोष्ट असल्याचे त्या म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in