हा आरक्षणाचा अंतिम लढा! मनोज जरांगे-पाटील यांचे आवाहन

सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे शनिवारी जरांगे-पाटील यांची सभा झाली
हा आरक्षणाचा अंतिम लढा! मनोज जरांगे-पाटील यांचे आवाहन
Hp

सोलापूर : आरक्षणासाठी आपल्या मराठा बांधवांनी बलिदान दिले आहे. ते विसरता येणार नाही. मराठा बांधवांच्या बायकांच्या कपाळावरचे कुंकू पुसले, याची आपल्याला आठवण ठेवायला लागणार आहे. त्यामुळे हा पहिला आणि शेवटचा लढा समजून ताकदीनं उभं राहा. आरक्षण पदरात पडलंच पाहिजे असा लढा द्या, असे कळकळीचे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केले.

सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे शनिवारी जरांगे-पाटील यांची सभा झाली. यावेळी ते म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणासाठी अनेकांनी बलिदान दिले. ते विसरता येणार नाही. अण्णासाहेब पाटलांपासून विनायक मेटेंपर्यंत आणि काकासाहेब शिंदेंपासून ५५ हून अधिक बांधवांनी समाजासाठी बलिदान दिले आहे. आपल्यासाठी त्यांच्या पत्नीच्या कपाळावरचं कुंकू पुसलं, याची आठवण आपल्याला ठेवावी लागणार आहे. आता पुढच्या काळात अन्याय होऊ द्यायचा नाही, हा लढा शेवटचा आणि पहिला समजून इतक्या ताकदीने लढायचा की मराठ्यांच्या पदरात आरक्षण पडलंच पाहिजे"

जरांगे-पाटील म्हणाले, ‘‘मराठा समाजातील काही नेते विरोध करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकजण माझ्याशी गद्दारी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी या समाजाचं लेकरू असून मराठा समाजासाठी एक इंचही नियत ढळू दिली नाही. यांनी आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. आपल्याला हलक्यात घेतलं, पण आपण साधे नाही आहोत, असा इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी दिला. ते म्हणाले की, ‘‘आम्ही निकष पार केले तरी आरक्षण मिळालेलं नाही. मराठा ही देशभरात एकमेव मागास सिद्ध झालेली जात आहे. मंडल कमिशनला ओबीसींची जनगणना करा, असं सांगण्यात आलं. मंडल कमिशनने मात्र नव्याने जनगणना केली नाही. इंग्रजांची आकडेवारी घेतली आणि ओबीसींना १४ टक्के आरक्षण दिले. ४० वर्षं एकमेकांशी पटत नसलेले एका रात्रीत एकत्र आले. मग आपण का नाही, असा सवाल देखील जरांगे यांनी उपस्थित केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in