काँग्रेसचे राज्यातील सात उमेदवार जाहीर; शाहू महाराज, धंगेकर, प्रणिती शिंदे यांना उमेदवारी

वंचित बहुजन आघाडीशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. यावेळी जागावाटपासोबतच प्रचारसभा व अन्य मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली.
काँग्रेसचे राज्यातील सात उमेदवार जाहीर; शाहू महाराज, धंगेकर, प्रणिती शिंदे यांना उमेदवारी

मुंबई : काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आली. सात राज्यांतील ५७ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातील ७ उमेदवारांची नावे आहेत. काँग्रेसची महाराष्ट्रातील उमेदवारांची ही पहिलीच यादी आहे. यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज छत्रपती, सोलापूरमधून आमदार प्रणिती शिंदे, पुण्यातून आमदार रवींद्र धंगेकर, नंदुरबारमधून ॲड. गोवाल के. पाडवी, लातूरमधून शिवाजी कलगे, नांदेडमधून वसंत चव्हाण यांचा समावेश आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाले असून दोन दिवसांत अंतिम निर्णय जाहीर होणार असल्याचे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

टिळकभवन येथे ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी गुरुवारी सकाळी चर्चा झाली. या चर्चेत मी व शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. यावेळी जागावाटपासोबतच प्रचारसभा व अन्य मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली. भारतीय जनता पक्ष घाबरल्याने महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान घेतले जात आहे. मागील दहा वर्षे देश बरबाद करणाऱ्या भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचेच मविआचे लक्ष्य असल्याचे पटोले यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शाहू महाराज छत्रपती (कोल्हापूर), प्रणिती शिंदे (सोलापूर), रवींद्र धंगेकर (पुणे), गोवाल पाडवी (नंदुरबार), बळवंत वानखेडे (अमरावती), डॉ. शिवाजी कलगे​​​​​​​ (लातूर), वसंत चव्हाण (नांदेड)

पुण्यात मोहोळ विरुद्ध धंगेकर लढत

पुण्यातून काँग्रेसने आमदार रवींद्र धंगेकर यांना रिंगणात उतरवले असून भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे आता पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात थेट सामना रंगणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in