शिवसेना-राष्ट्रवादी आमदार अपात्रताप्रकरणाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. दरम्यान मागील सुनावणीवेळी आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तयार केलेल्या वेळापत्रकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी(१७ ऑक्टोबर) सुधारीत वेळापत्रत सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी आज सुधारित वेळापत्रक दिलं नाही. वेळेअभावी नवं वेळापत्रक सादर करता आलं नाही, असा युक्तीवाद अध्यक्षांच्या वकिलांनी न्याालयात केला.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांना नवं वेळापत्रक सादर करण्यासाठी पुन्हा एक संधी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. विधानसभा अध्यक्षांना ३० ऑक्टोबर ही शेवटची संधी देण्यात आली आहे. या तारखेला विधानसभा अध्यक्षांना नवं वेळापत्रक सादर करावं लागले असं न्यायालयाने म्हटलं आहे.
आज देखील न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. अध्यक्षांनी दिलेल्या वेळापत्रकाबद्दल आम्ही समाधानी नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे.
तर सॉलिलिटर जनरल तुषार मेहरांनी नवरात्रीच्या सुटीत ते अध्यक्षांबरोबर बसून चर्चा करणार असल्याचं कोर्टाला आश्वस्त केलं आहे. कोर्टान कालमर्यादा घालून देण्यापूर्वी अध्यक्षांना एक शेवटची संधी देणं गरजेचं आहे. ३० सप्टेंबर हे प्रकरण सुनावणीसाठी ठेवलं जाणार आहे.