महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.
कोरोनाच्या साथीनंतर यावर्षी पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये निकालाची कमालीची उत्सुकता आहे. यंदा १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. २५ मे रोजी निकाल जाहीर झाल्यावर २६ मेपासून ५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल, तर उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी २६ मे ते १४ जून दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ५ जून रोजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात गुणपत्रिका मिळणार आहे.
असा पहा निकाल
गुरुवारी दुपारी दोन वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना mahahsscboard.in, mahresult.nic.in, Maharesult.nic.in, hsc.maharesult.org.in, hscresult.mkcl.org या संकेतस्थळांवर ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahresult.nic.in) जाऊन HSC result 2023 या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा परीक्षेचा बैठक क्रमांक (सीट नंबर) आणि जन्मतारीख टाकून निकाल पाहू शकता. निकालाच्या पीडीएफ कॉपीची प्रिंटआऊटही काढता येईल.