मताधिक्याने जिंकलेल्यांना अर्धी मतेही मिळवता आली नाहीत; रोहिणी खडसे यांचा भाजपवर निशाणा, 'सह्याद्री' साखर कारखाना निवडणूक

'सहयाद्री कारखाना' निवडणूकीमध्ये 32 हजार मतदानापैकी विजयी उमेदवाराच्या अर्धी मते पण घेऊ शकला नाही, असे ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे-खेवलकर यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
मताधिक्याने जिंकलेल्यांना अर्धी मतेही मिळवता आली नाहीत; रोहिणी खडसे यांचा भाजपवर निशाणा, 'सह्याद्री' साखर कारखाना निवडणूक
Published on

केवळ चार महिन्यांपूर्वी ५० हजार मताधिक्याने जिंकलेला भाजपचा एक आमदार, पैशाचे वारेमाप वाटप करून देखील मतपत्रिकेवर घेतलेल्या कराडच्या 'सहयाद्री कारखाना' निवडणूकीमध्ये 32 हजार मतदानापैकी विजयी उमेदवाराच्या अर्धी मते पण घेऊ शकला नाही, असे ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे-खेवलकर यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेलीस कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीतील माजी मंत्री व माजी आमदार बाळासाहेब पाटलांच्या एकतर्फी विजयानंतर आज रोहिणी खडसेंनी भाजपवर चांगलाच निशाणा साधताना त्या म्हणाल्या, केवळ चारच महिन्यापूर्वी भाजपचे आमदार म्हणून ५० हजार मताधिक्याने जिंकलेले व या निवडणुकीत पैशाचा वारेमाप वाटप करूनदेखील, आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वा खालील पॅनेलला मतपत्रिकेवर मतदान घेतलेल्या 'सहयाद्री कारखाना' निवडणूकीमध्ये विजयी उमेदवाराच्या अर्धी मते पण घेऊ शकला नाही,असे म्हणत त्यांनी थेट घोरपडेंच्या आमदारकीवरच शंका उपस्थित केली आहे.

कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलचा एकतर्फी विजय होत या पॅनेलने कारखान्याच्या सर्वच्या सर्व २१ जागांवर विजय मिळवत विरोधी दोन्ही पॅनेलचा सुफडासाफ केला. केवळ चारच महिन्यांपूर्वी ५० हजार मताधिक्याने जिंकलेले भाजप आमदार मनोज घोरपडेंच्या नेतृत्वाखालील पॅनल 'बॅलेट पेपर'वर घेतलेल्या वरील निवडणूकीमध्ये विजयी उमेदवाराच्या अर्धी मते पण मिळऊ शकला नाही,असे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.

राज्य विधानसभा निवडणुकीनंतर पार पडलेल्या या पहिल्याच निवडणुकीकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासह सहकार क्षेत्राचे सह्याद्री सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीकडे लक्ष लागले होते.या निवडणुकीत भाजपचे कराड उत्तरचे आ.मनोज घोरपडे,भाजप सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम,काँग्रेस कराड उत्तरचे नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात या विरोधी दोन पॅनलशी एकट्या बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलशी तिरंगी लढत पार पडली होती. रविवारी या निवडणूक मत मोजणीच्या पहिल्या फेरीत सत्ताधारी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पी. डी. पाटील पॅनेलने तब्बल ४ हजार मतांची आघाडी घेतली होती. अनेक तास मतमोजणी सुरु होती, मात्र पहिल्या फेरीपासूनच सत्ताधारी गटाची मतांची आघाडी कायम राहील्याने विजय निश्चित झाला व सत्ताधारी गटाकडून जल्लोष सुरू झाला होता.

ईव्हीएमचा चमत्कार की मतपत्रिकेचा साक्षात्कार

दरम्यान, रोहिणी खडसे-खेवलकर यांनी ज्यांना चारच महिन्यांपूर्वी कारखान्याच्या याच कार्यक्षेत्रातील कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत 50 हजार मताधिक्याने विजय मिळवूनही ३२ हजार मतदारांच्यातील अर्धी मते पण घेता आली नाहीत मग हा ईव्हीएम मशीनचा चमत्कार की मतपत्रिकेवरील मतदानाचा साक्षात्कार अशा अर्थाने शंका उपस्थित केली आहे.मात्र खडसे यांच्या या ट्विटची सोमवारी दिवसभर कारखाना कार्यक्षेत्रातील सातारा,सांगली जिल्ह्यातील राजकिय वातावरणात चांगलीच चर्चा सुरू होती.

logo
marathi.freepressjournal.in