मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर हल्ला करण्याची धमकी

मुंबई : गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीवर हल्ला करण्याच्या धमक्या दिल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही हल्ला करण्याची धमकी देणारा संदेश पाकिस्तानातून मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मिळाला आहे.
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीससंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीवर हल्ला करण्याच्या धमक्या दिल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही हल्ला करण्याची धमकी देणारा संदेश पाकिस्तानातून मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मिळाला आहे.

नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी पोलिसांनी जाहीर केलेल्या व्हाटसअपवर धमकीचा मेसेज आला. मेसेज पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीने आपले नाव मलिक शाहबाज हुमायून असल्याचे नमूद केले आहे. हा मेसेज पाकिस्तानातून पाठवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे.

logo
marathi.freepressjournal.in