"50 लाख द्या, नाहीतर जीवे मारिन", भुजबळांपाठोपाठ धनंजय मुंडे यांना धमकीचा फोन

भुजबळांना धमकीचा फोन करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे
"50 लाख द्या, नाहीतर जीवे मारिन", भुजबळांपाठोपाठ धनंजय मुंडे यांना धमकीचा फोन

मंत्री छगन भुजबळ यांच्यापाठोपाठ मंत्री धनंजय मुंडे यांना देखील जीवे मारण्याची धमकी आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांच्या परळीतील घरी हा धमकीचा फोन आल्याचं सांगतलं जात आहे. यावेळी धमकी देणाऱ्याकडून ५० लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मला ५० लाख रुपये द्या. अन्यथा तुम्हाला जीवे मारिन अशी धमकी फोन करणाऱ्या अज्ञाताने दिली. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. तसंच या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

मंत्री छगन भुजबळ हे काल पुण्यात होते, यावेळी त्यांच्या कार्यकर्त्याच्या मोबाईवर धमकीचा फोन आला होता. त्यापाठोपाठ आता मंत्री धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांच्या परळीतील घरी एका अज्ञाताने फोन करुन मला ५० लाख रुपये द्या. अन्यथा मी तुम्हाला जीवे मारिन. मला धनंजय मुंडे यांना मारण्याची सुपारी देण्यात आली आहे.. असा फोन आला. यानंतर तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांना देखील जीवे मारण्याची सुपारी देण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं.

मंत्री भुजबळ यांना धमकी देणारा अटकेत

मंत्री छगन भुजबळ काल पुण्यात असताना त्यांच्या कार्यकर्त्याच्या मोबाईवर एक कॉल आला. यावेळी समोरच्या व्यक्तीनं मला छगन भुजबळ यांची सुपारी मिळाली असलयाचे सांगत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वत:चं नाव प्रशांत पाटील सांगितलं. पोलिसांनी या धमकी देणाऱ्याला अटक केली असून त्याने दारुच्या नशेत असताना धमकी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in