माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धमकीचा फोन ; संभाजी भिडेंवर केली होती कारवाईची मागणी

पृथ्वीराज चव्हाण यांना धमकीचा फोन आल्यानंतर त्यांच्या कराड येथील निवासस्थानी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धमकीचा फोन ; संभाजी भिडेंवर केली होती कारवाईची मागणी

काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धमकीचे फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांना धमकीचे फोन आले आहेत. एका अज्ञात व्यक्तीने चव्हाण यांना धमकीचा फोन केला आहे. यामुळे त्यांच्या कराड येथील निवासस्थानी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. धमकीचा फोन केलेल्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रतिक्रिया सुरु झाली आहे.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेचे संस्थापक आणि प्रमुख संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी अमरावतीत येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. ही संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी बाब असून सरकारन त्यांच्यावर कारवाई करावी, त्यांना अटक करावी अशी मागणी काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली होती.

संभाजी भिडे ही विकृती आहे.त्यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अवमानकारक विधान केलं आहे. जे संपूर्ण देशाला अस्वस्थ करणारं आहे. भिडे वारंवार असं बोलून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in