गांजा विक्री प्रकरणी तिघांना अटक

संशयितांकडून १ मोटारसायकल आणि २ मोबाईलही जप्त केले आहेत.
गांजा विक्री प्रकरणी तिघांना अटक

कराड : सातारा जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि फलटण ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी रात्री संयुक्तपणे केलेल्या कारवाईत पिंप्रद (ता. फलटण) गावच्या हद्दीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघांना सापळा रचून पकडले. त्यांच्याकडून ६ लाख ४१ हजार रुपये किंमतीचा २५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सुनील भांग्या पावरा (रा. रोहिणी, ता. शिरपूर, जि धुळे), उमेश भाईदास पावरा (रा. बोराडी, ता. शिरपूर, जि धुळे) आणि राजेंद्र बबनराव कापसे (रा. निंबळक, ता. फलटण) यांना अटक करण्यात आली आहे. संशयितांकडून १ मोटारसायकल आणि २ मोबाईलही जप्त केले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in