गुप्तांग कापून वडखळच्या 'सावली' लॉज व्यवस्थापकाची निर्घृण हत्या, महिलेसह तिघांना अटक

त्या करणारे आरोपी पेण येथे वाहन बदलून एसटी बसने पनवेलकडे जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
गुप्तांग कापून वडखळच्या 'सावली' लॉज व्यवस्थापकाची निर्घृण हत्या, महिलेसह तिघांना अटक

पेण : पेण तालुक्यातील वडखळ येथील सावली लॉजचे व्यवस्थापक धर्मेद्र कुशवाह यांची मंगळवारी रात्री गळा चिरून व लिंग छाटून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येमुळे वडखळ परिसर व पेण तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी पळून जाणाऱ्या महिलेसह तीन परप्रांतीयांना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी पेण व पनवेलकडे जाणाऱ्या महामार्गावर वाहनांची तपासणी सुरू केली. त्यावेळी हत्या करणारे आरोपी पेण येथे वाहन बदलून एसटी बसने पनवेलकडे जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून सदर एसटीचा पोलिसांनी पाठलाग केला. एसटी आडवून चंद्रजीत झंकूराम भारद्वाज (३०), हरिशंकर लालचंद राजभर (१९), अंजुदेवी सरोज चौहान (३२) या ३ जणांना  उत्तरप्रदेश व झारखंड येथे पळून जात असताना ताब्यात घेण्यात आले आहे.

अंजुदेवी सरोज चौहानचे चंद्रजीत भारद्वाज याच्याशी प्रेमसंबंध होते. तसेच तिचे लॉजचे व्यवस्थापक धर्मेद्र कुशवाहबरोबर अनैतिक संबंध होते. धर्मेद्र कुशवाह व चंद्रजीत भारद्वाज  यांच्यामध्ये एक आठवड्यापूर्वी भांडण झाले होते. त्यावेळीच चंद्रजीतने धर्मेंद्र याला ठार मारण्याचा निश्चय केला. त्याची हत्या करण्याकरिता अंजुदेवी सावली लॉजवर गेली. ती व्यवस्थापक धर्मेंद्रला शारीरिक संबंधासाठी रूम नं.११५ मध्ये  घेऊन गेली. त्याचवेळी प्लॅन केल्याप्रमाणे चंद्रजीत व हरीशंकर रूममध्ये गेले व रूमचा दरवाजा आतून बंद करून  तिघांनी संगनमत करून मयताचे तोंड दाबून खाली पाडून त्याचे छातीवर बसून चाकूने गळा चिरला व त्यानंतर त्याचे लिंग छाटून त्यांची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली.

logo
marathi.freepressjournal.in