ठाकरे गटाच्या तीन बड्या नेत्यांनी 'सागर' बंगल्यावर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण; काय होता भेटीचा अजेंडा?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि.10) सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले होते. त्यातच सोमवारी दुपारी शिवसेना उबाठाच्या तीन बड्या नेत्यांनी फडणवीसांची अचानक भेट घेतली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकाणात बदलाचे वारे वाहत आहे, अशा आशयाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
मुख्यमंत्री फडणवीसांची ठाकरे गटाच्या तीन बड्या नेत्यांशी भेट; राजकीय चर्चांना उधाण; काय होता भेटीतील अजेंडा?
मुख्यमंत्री फडणवीसांची ठाकरे गटाच्या तीन बड्या नेत्यांशी भेट; राजकीय चर्चांना उधाण; काय होता भेटीतील अजेंडा?संग्रहित छायाचित्र
Published on

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि.10) सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले होते. त्यातच सोमवारी दुपारी शिवसेना ठाकरे गटाच्या तीन बड्या नेत्यांनी फडणवीसांची अचानक भेट घेतली त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकाणात बदलाचे वारे वाहत आहेत का? अशा आशयाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रथम राज ठाकरे यांना त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आणि विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर, माजी मंत्री सुभाष देसाई आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फडणवीस यांची त्यांच्या सरकारी निवासस्थानी सागर बंगल्यावर भेट घेतली. यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या.

काय होते 'या' भेटीचे कारण?

सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांसोबतची ही भेट हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाशी संबंधित होती. तथापि, बैठकीत तीन मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीमुळे भेटीचा सखोल राजकीय अर्थही काढला जात आहे.

कसे असणार आहे बाळासाहेबांचे स्मारक?

शिवाजी पार्क येथील जुन्या महापौर बंगल्याच्या परिसरात हे स्मारक उभारण्यात येत आहे. हे स्मारक दोन टप्प्यात बांधले जात आहे. पूर्ण झालेल्या पहिल्या टप्प्यात इमारतीची दुरुस्ती, स्थापत्य, विद्युत आणि वातानुकूलित वातानुकूलित यंत्रणा उभारणी, बाह्य सुशोभीकरण आणि वाहनतळ उभारणी, रेनवॉटर हार्वेस्टिंग इत्यादींचा समावेश आहे.

दुसऱ्या टप्प्यात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून अत्याधुनिक 'इमर्सिव्ह संग्रहालया'चे बांधकाम करण्यात येईल. येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनपटाचे प्रदर्शन करणारी छायाचित्र, दृश्यचित्रे तसेच त्यांचा राजकीय प्रवास दर्शवणारी माहिती प्रदर्शित केली जाईल. यामध्ये लेझर शो, डिजिटल मॅपिंग, प्रोजेक्शन इत्यादी कामे केली जाणार आहेत.

पहिला टप्पा 180 कोटी रुपये खर्चून पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना उबाठा नेत्यांनी स्मारकाच्या प्रगती आणि भविष्यातील योजनांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

logo
marathi.freepressjournal.in