
सांगली : कृष्णा नदीत चार चाकी कोसळून झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले.
कोल्हापूरहून सांगलीकडे जाणारी ही चारचाकी कार पुलावरून खाली कोसळली. या अपघातात प्रसाद भालचंद्र खेडेकर (३५) व त्यांची पत्नी प्रेरणा प्रसाद खेडेकर (३६) व वैष्णवी संतोष नार्वेकर (२१) यांचा मृत्यू झाला, तर समरजीत प्रसाद खेडेकर (७), वरद संतोष नार्वेकर (१९) व साक्षी संतोष नार्वेकर (४२) हे जखमी झाले आहेत.
स्थानिक नागरिक व जयसिंगपूर पोलिसांनी धाव घेऊन जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, तर अपघातातील मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.