गडचिरोलीत एसटीच्या अपघातात सात महिन्यांच्या चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू

चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कठडे तोडून एसटी बस रस्त्याच्या कडेला उलटली. लालपरीच्या या अपघातात सात महिन्यांच्या चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू झाला आहे.
गडचिरोलीत एसटीच्या अपघातात सात महिन्यांच्या चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू
गडचिरोलीत एसटीच्या अपघातात सात महिन्यांच्या चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू(Photo-X/@airnews_mumbai)
Published on

गडचिरोली : चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कठडे तोडून एसटी बस रस्त्याच्या कडेला उलटली. लालपरीच्या या अपघातात सात महिन्यांच्या चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल ३३ प्रवासी जखमी झाले आहेत. गडचिरोलीहून उमरखेडकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या लालपरी बसचा गुरुवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात ख्वाजा शाहबुद्दीन, लक्ष्मीबाई दुरकीवार आणि सात महिन्यांचा शिवांश नवघरे अशी मृतांची नावे आहेत.

नवेगाव-मुरखळा परिसरातील वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव बसने रस्त्यालगतचा लोखंडी कठडा तोडला आणि थेट शेतात जाऊन पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की बसमध्ये एकच आरडाओरड आणि गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत काही प्रवाशांना खिडक्या फोडून बाहेर काढले.

logo
marathi.freepressjournal.in