२१ कोटी रुपयांमध्ये तीन आमदार फुटले; राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांचा आरोप

इकडे आमदारांची मते वळवण्यासाठी एका आमदाराला सात-सात कोटी रुपये द्यावे लागतात.
२१ कोटी रुपयांमध्ये तीन आमदार फुटले; राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांचा आरोप

विधान परिषदेच्या निवडणुकीत एका पक्षाचे तीन आमदार २१ कोटी रुपयांमध्ये फुटले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. प्रत्येक आमदाराला सात कोटी रुपये दिले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मिटकरी यांच्या वक्तव्यानंतर हे तीन आमदार नेमके कोण आणि कोणत्या पक्षाचे, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

मिटकरी म्हणाले, ‘‘सध्या जमिनीची किंमत पाच लाख रुपये आहे. चार एकर जमीन विकली, तर २० लाख रुपये येतील; मात्र इकडे आमदारांची मते वळवण्यासाठी एका आमदाराला सात-सात कोटी रुपये द्यावे लागतात. उमेदवारासाठी जो घोडेबाजार सुरू आहे, तो धक्कादायक आहे. आम्हालाही इतर पक्षांकडून गटनेते पदाची ऑफर देण्यात आली आहे. या बदल्यात एक मर्सिडीज कार, दोन लाख रुपये महिना आणि वर दोन खोकी देऊ, अशी ऑफर देण्यात आल्याचेही मिटकरी म्हणाले. दीड महिन्यापेक्षा जास्त शिंदे-फडणवीस सरकार टिकणार नसल्याचा दावाही मिटकरी यांनी केला आहे. दीड महिन्यांनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल आणि मध्यवर्ती निवडणुका झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील एक नंबरचा पक्ष असेल, अशा विश्वासही मिटकरींनी व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in