कामराविरुद्ध आणखी तीन गुन्हे दाखल

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून विडंबनात्मक गाणे गाणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्याविरुद्ध आणखी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कामराविरुद्ध आणखी तीन गुन्हे दाखल
Published on

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून विडंबनात्मक गाणे गाणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्याविरुद्ध आणखी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जळगावच्या महापौरांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून नाशिकमध्ये एका हॉटेल व्यापाऱ्याने आणि व्यावसायिकाने गुन्हा दाखल केला आहे. हे तिन्ही गुन्हे मुंबईच्या खार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती खार पोलिसांनी दिली.

मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला दोन समन्स बजावले असून त्याला आता सोमवारी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्र विधान परिषदेच्या अध्यक्षांनी २७ मार्च रोजी त्याच्याविरुद्धची हक्कभंगाची नोटीस स्वीकारली असून हे प्रकरण पुढील कारवाईसाठी विशेषाधिकार समितीकडे पाठविण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in