Afzal Khan : प्रतापगडच्या पायथ्याशी आणखी तीन कबरी कुणाच्या?

शिव प्रतापदिनी साताऱ्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी (Afzal Khan) असलेल्या अफझल खानाच्या कबरीजवळ झालेले अतिक्रमण हटवण्यात आले.
Afzal Khan : प्रतापगडच्या पायथ्याशी आणखी तीन कबरी कुणाच्या?

साताऱ्यात शिवप्रताप दिनी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवण्यात आले. मात्र ही कारवाई सुरु असताना तिथे आणखी तीन कबरी आढळून आलेल्या आहेत. या वृत्ताला साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. तर, त्यातील एक कबर ही सय्यद बंडाची कबर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, इतर २ कबरी कुणाच्या आहेत? याचा शोध सध्या महसूल प्रशासन करत आहे.

१० नोव्हेंबरला शिव प्रतापदिनी साताऱ्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीजवळ झालेले अतिक्रमण हटवण्यात आले. मात्र, यावेळी या कबरीजवळ आणखी ३ कबरी आढळून आल्या आहेत. त्यातील एक कंबर ही सय्यद बंडाची असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. पण, १९१६मध्ये द. बा. पारसनिस यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये त्यांनी स्वतः काढलेले फोटो छापण्यात आलेले आहेत. त्यामध्ये फक्त अफझल खानाची कबर दिसून येते. म्हणून १९१६ नंतर तिथे या कबरी कुठून आल्या? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in