ताबा सुटलेल्या चारचाकीने तीन महिलांना उडवले

चारचाकी चालकाला नागरिकांनी अडवण्याता प्रयत्न केला
ताबा सुटलेल्या चारचाकीने तीन महिलांना उडवले

पुणे : पुण्यात अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यातच सिंहगड रोडवरील अपघाताची मालिका संपायचे नाव घेत नाही आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे चारचाकी गाडीने ३ महिलांना जोरदार धडक दिली आहे. पुण्यातील सिंहगड रोड भागात असलेल्या हिंगणे चौकात हा अपघात मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला आहे. अपघातात ३ महिला आणि १ लहान मुलगा जखमी झाला असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा थरारक व्हिडीदेखील समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आनंद नगरकडे जाताना हिंगणे बस स्थानकाच्या जवळ चालकाचं चारचाकी वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले. दरम्यान, हिंगणे बसस्टॉपवर उभ्या असलेल्या गाडीला चारचाकी धडकली. त्यानंतर या चारचाकीने थेट तीन महिलांना उडवलं. यात बाजूला उभ्या असलेल्या मुलालादेखील इजा झाली आहे. त्यानंतर सिंहगड रोडवर गोंधळ उडाला होता. अनेक नागरिक एकत्र जमले होते. अपघात होतान नागरिकांनी थेट रुग्णवाहिका बोलवून महिलांना आणि मुलांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या चारचाकी चालकाला नागरिकांनी अडवण्याता प्रयत्न केला; मात्र चालक निघून गेला आहे. या चालकाचा शोध सध्या सुरू आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in