खंडपीठाच्या मागणीसाठी लोकप्रतिनिधींची वज्रमूठ, आचारसंहितेपूर्वी न्यायमूर्तींना भेटणे गरजेचे- शाहू महाराज

पश्चिम महाराष्ट्रातील चार व कोकणातील दोन अशा सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, यासाठी गेल्या ४० वर्षांपासून वकील, पक्षकारांचा लढा सुरू आहे.
खंडपीठाच्या मागणीसाठी लोकप्रतिनिधींची वज्रमूठ, आचारसंहितेपूर्वी न्यायमूर्तींना भेटणे गरजेचे- शाहू महाराज
Published on

कराड : पश्चिम महाराष्ट्रातील चार व कोकणातील दोन अशा सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, यासाठी गेल्या ४० वर्षांपासून वकील, पक्षकारांचा लढा सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती मोहित शहा यांनीही यापूर्वीच कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे याबाबत सकारात्मक अहवाल दिला आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीची भेट घेऊन याचा निर्णय घ्यायचा आहे. आगामी विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्याआधी या भेटीची तारीख घ्यावी, आपण सर्वानी एकजुटीने काम करून हा लढा यशस्वी बनवूया, असे आवाहन कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी केले.

कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीबाबत पुढील कार्यवाहीची दिशा ठरविण्यासाठी प. महाराष्ट्र व कोकण अशा सहा जिल्ह्यांतील वकील, लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय कृती समिती व पक्षकारांची बैठक रविवारी दुपारी कोल्हापूरच्या शासकिय विश्रामगृहामध्ये पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आवाहन केले.

यावेळी खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि राज्याचे माजी राज्यमंत्री व आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा’

यावेळी राज्याचे माजी राज्यमंत्री व आमदार सतेज पाटील म्हणाले की, 'मुख्यमंत्री शिंदे यांनी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींची भेट घेणे आवश्यक आहे. या भेटीसाठी शाहू छत्रपती महाराजांच्या नेतृत्त्वाखाली सर्व लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. लवकरात लवकर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्य न्यायमूर्तींची भेट होण्यासाठी प्रयत्न करूया.

logo
marathi.freepressjournal.in