या प्रसिद्ध टिक-टॉककरचा शॉक लागून मृत्यू; आपल्या हटके स्टाईलमुळे झाला होता प्रसिद्ध

आपल्या हटके स्टाईलने नेटकऱ्यांना खळखळून हसवणाऱ्या टिकटॉक स्टारचा शॉक लागून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
या प्रसिद्ध टिक-टॉककरचा शॉक लागून मृत्यू; आपल्या हटके स्टाईलमुळे झाला होता प्रसिद्ध

प्रसिद्ध टिकटॉक स्टार संतोष मुंडे याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपल्या हटके स्टाईलने नेटकऱ्यांना खळखळून हसवणाऱ्या संतोषचा विद्युत वाहक डीपीमधील फ्युज टाकत असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने करंट लागून दुर्दैवी अंत झाला. त्याच्यासोबत बाबुराव मुंडे यालादेखील करंट लागल्याने मृत्यू झाला. मात्र, या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सोशल मीडियावर टिक टॉक स्टार संतोष मुंडेच्या निधनाची बातमी कळताच सर्वांनी दुःख व्यक्त केले. संतोष त्याच्या हटके स्टाईलसाठी ओळखला जात होता. त्याचे लाखांहुन अधिक फॉलोवर्स आहेत. ग्रामीण शैलीमध्ये त्याची मनोरंजन करण्याची पद्धत अनेकांच्या पसंतीस उतरत होती. संतोषच्या निधनाची बातमी कळताच पोलिसांनी भोगलवाडीकडे धाव घेतली. त्याच्या मृत्युची नोंद करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीदेखील त्याच्या मृत्यूची दखल घेतली असून त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना, महावितरणने तातडीने मदत करावी, अशी मागणी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in