वेळ आली, एकत्र येण्याची! मुंबई, महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार; उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना साद

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला (उबाठा) एकत्र येण्याचे संकेत देताच उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरेंच्या भूमिकेवर सकारात्मक प्रतिसाद दिला. राज आणि उद्धव एकत्र येणार या चर्चेनेच राजकीय वातावरण ढवळून निघाले. त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांना साद घातली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला (उबाठा) एकत्र येण्याचे संकेत देताच उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरेंच्या भूमिकेवर सकारात्मक प्रतिसाद दिला. राज आणि उद्धव एकत्र येणार या चर्चेनेच राजकीय वातावरण ढवळून निघाले. त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांना साद घातली आहे. 'वेळ आलीय एकत्र येण्याची मुंबई, महाराष्ट्रासाठी, शिवसैनिक तयार आहे मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी' अशी पोस्ट उद्धव ठाकरे यांच्या फोटोसह ठाकरेंच्या शिवसेनेने एक्सवर केली आहे.

शिवसेनेने केलेल्या 'पोस्ट' मुळे पुन्हा उद्धव व राज हे एकत्र येण्याच्या दिशेने पावले पडू लागली आहेत.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे सोबत येण्याचे संकेत दिले होते. महाराष्ट्र एवढा मोठा आहे की, आमची भांडणं किरकोळ आहे, असे सांगत राज ठाकरे यांनी उद्धव यांना साद घातली. राज ठाकरे यांनी मुलाखतीत केलेल्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ही भारतीय कामगार सेनेच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांना टाळी दिली. त्यानंतर राजकारण चांगलेच तापले, मनसे कार्यकत्यांनी अटी शर्ती घातल्या, मात्र राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना २९ एप्रिलपर्यंत गप्प राहण्याचे आदेश दिल्याने सगळे शांत झाले होते. मात्र शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एक्सवर पोस्ट करत राज ठाकरे यांना साद घातली आहे.

राजकारणात कधी काही घडेल हे काहीच सांगता येत नाही. मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी महाराष्ट्रातील जनतेसह मनसे व शिवसैनिकांची भावना आहे. अशातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे परदेश दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे निर्णय दोन्ही पक्षाच्या प्रमुखांना घ्यावयाचा असल्याने पुढे काय होतं हे लवकरच स्पष्ट होईल.

logo
marathi.freepressjournal.in