मुंबईमध्ये आज १,३१० नवे रुग्ण, राज्यातील संख्या ?

दिवसभरात १,११६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत १० लाख ६२ हजार २८० रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे.
File Photo
File Photo
Published on

मुंबईत कोरोनाच्या चौथ्या लाटेचा चढ-उतार पहावयास मिळत आहे. सलग तीन दिवस दोन हजार पार गेलेली रुग्ण संख्या सोमवारी पंधराशेच्या आत आली. सोमवारी दिवसभरात १,३१० नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या १० लाख ९५ हजार ९५४वर पोहोचली आहे. तर दिवसभरात दोन रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ५८५वर पोहोचली आहे. दिवसभरात १,११६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत १० लाख ६२ हजार २८० रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या १४ हजार ८९ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या तीन हजारांच्या आत आली असून आज 2354 नव्या रुग्णांची भर पडली आहे.

logo
marathi.freepressjournal.in