मतदारांसाठी टोकन सिस्टम अन् वेटिंग रूम; मुंबई शहरात २४ लाख ५९ हजार ४४३ मतदार

मुंबई शहर जिल्ह्यात ‘३०-मुंबई दक्षिण मध्य’, ‘३१-मुंबई दक्षिण’ हे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात २४ लाख ५९ हजार ४४३ मतदार असून जिल्ह्यात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे.
मतदारांसाठी टोकन सिस्टम अन् वेटिंग रूम; मुंबई शहरात २४ लाख ५९ हजार ४४३ मतदार

मुंबई : लोकसभा निवडणुकीत मतदारांसाठी टोकन पद्धत सुरू करण्यात येणार असून मतदारांसाठी वेटिंग रूम उपलब्ध करण्यात येणार आहे. दरम्यान, मोबाईल ॲॅपवर १६ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत मुंबई शहर जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहिता उल्लंघनासंदर्भात एकूण ४० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या सर्व ४० तक्रारींचे निराकरण तातडीने करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणूकीसाठी मतदार नोंदणी करून सक्षम लोकशाहीमध्ये सहभागी व्हावे. मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी उपलब्ध असून मतदारांनी मतदारयादीत आपले नाव तपासून घ्यावे. तसेच काही अडचण आल्यास मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे मतदारांसाठी मतदार हेल्पलाइन क्रमांक ०२२२०८२२६९३ सुरू करण्यात आला आहे. मतदारांनी या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव केले आहे. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यादव बोलत होते.

मुंबई शहर जिल्ह्यात ‘३०-मुंबई दक्षिण मध्य’, ‘३१-मुंबई दक्षिण’ हे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात २४ लाख ५९ हजार ४४३ मतदार असून जिल्ह्यात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. तर ४ जून २०२४ (मंगळवार) रोजी मतमोजणी होणार आहे. तरी, मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क येत्या २० मे रोजी आवर्जून बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

निवडणुकीसाठी साडेबारा हजार कर्मचारी सज्ज

लोकसभा निवडणूक-२०२४ साठी मुंबई शहर जिल्ह्याअंतर्गत असलेल्या मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी साडेबारा हजार अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत. निवडणुका पारदर्शक नि:पक्षपाती व भयमुक्त वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती यावेळी संजय यादव यांनी दिली.

असे आहे मतदार

  • एकूण मतदार :- २४ लाख ५९ हजार ४४३

  • एकूण पुरुषः- १३ लाख २८ हजार ५२०

  • एकूण स्त्री:- ११ लाख ३० हजार ७०१

  • एकूण तृतीयपंथीः- २२२

logo
marathi.freepressjournal.in