वारकऱ्यांना दिलेली टोलमाफी कागदावरच ?

कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणेच आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला होता
वारकऱ्यांना दिलेली टोलमाफी कागदावरच ?
ANI

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी बांधवांच्या वाहनांना टोलमध्ये सूट देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र, टोलमध्ये सूट केवळ कागदावरच असल्याचा अकोल्यातील वारकऱ्यांना अनुभव आला आहे. अकोल्यातील काही वारकरी पंढरपूरकडे निघाले असताना बीड-उस्मानाबाद रस्त्यावरील पारगाव येथील आयआरबी कंपनीच्या टोल गेटवर वारकऱ्यांकडून टोल वसूल करण्यात आला. यावेळी वारकऱ्यांनी टोल मागणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. अशा स्थितीत वारकऱ्यांना दिलेली टोलमाफी कागदावरच आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

काय म्हणाले होते मुख्यमंत्री शिंदे? 

कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणेच आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला होता. तसेच वारकऱ्यांच्या वाहनांवर स्टिकर लावण्याची व्यवस्था करून त्यांची प्रादेशिक परिवहन अधिकारी व पोलिसांकडे नोंदणी करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आढावा घेतल्याचे सांगितले होते. सर्व अधिकारी, पोलीस, पंढरपूर मंदिर समितीने एकत्रित आढावा घेतला आहे. एसटीने चार हजार बसेस दिल्या आहेत. गरज भासल्यास आणखी बसेस देण्यास एसटी महामंडळाला सांगण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in