कर्जत-खालापूर तालुक्यात पर्यटकांना बंदी

कर्जत तालुक्यातील १८ तर खालापूर तालुक्यातील १४ अशा ३२ गावाचा समावेश आहे.
कर्जत-खालापूर तालुक्यात पर्यटकांना बंदी

मुंबई –पुणे या दोन शहराच्या मध्यभागी असलेल्या कर्जत व खालापूर तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. पावसाळ्यात हजारो पर्यटक कर्जत -खालापूर तालुक्यातील धबधब्यावर फिरायला-मजा करायला येत असतात. पण मौज मजा करण्याच्या नादात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार घडत असतात. कर्जत-खालापूर या दोन तालुक्यातील धबधब्यावर व धरणावर दोन महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. कर्जत तालुक्यातील १८ तर खालापूर तालुक्यातील १४ अशा ३२ गावाचा समावेश आहे.

पावसाळ्यात कर्जत तालुक्यातील अवसरे धरण, साळोख धरण, खांडस धरण, पाषाणे धरण, डोंगरपाडा धरण, पाली भूतिवली धरण, बेकरे कोल्हा धबधबा, कोमलवाडी धबधबा, बेडीसगाव धबधबा, टपालवाडी धबधबा, आनंदवाडी धबधबा, नेरळ-जुम्मापट्टी धबधबा, मोहिली धबधबा, वदप धबधबा, आषाणे-कोषाणे धबधबा, पळसदरी धरण व धबधबा, कोंढाणे लेणी-धरण-धबधबा, सोलनपाडा धरण-पाझर तलाव याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. खालापूर तालुक्यातील धामणी कातकरवाडी तलाव, बोरगाव धबधबा, पोखरवाडी बंधारा-बोरगाव, झेनिथ धबधबा व परिसर, आडोशी धबधबा व परिसर, आडोशी पाझर तलाव, मोरबे धरण, नढाळ/वरोसे धरण, पळसाचा बंधारा (टेपाचीवाडी नढाळ), वावर्ले बंधारा, डोणवत धरण, कलोते धरण, माडप धबधबा, भिलवले धरण या गजबजलेल्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी व त्यांच्या १ कि.मी. परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) नुसार बंदी घालण्यात आली आहे.

पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे, धोकादायक वळणे पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात, खोलपाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली करणे, सायंकाळी ६.०० वाजल्यापासून ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत या कालावधीत बंदी असेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in