धुळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत दु:खद घटना; ट्रॅक्टरखाली चिरडून ३ चिमुरड्यांचा मृत्यू

राज्यभरात मोठ्या भक्तिभावाने गणपती बाप्पाला निरोप दिला जात असताना धुळ्यात अत्यंत दु:खद घटना घडली.
विसर्जन मिरवणुकीचे संग्रहित छायाचित्र
विसर्जन मिरवणुकीचे संग्रहित छायाचित्र
Published on

धुळे : राज्यभरात मोठ्या भक्तिभावाने गणपती बाप्पाला निरोप दिला जात असताना धुळ्यात अत्यंत दु:खद घटना घडली. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान टॅक्टरखाली आल्यामुळे ३ मुलांचा जागीच मृत्यू झाला. तसेच, अन्य ६ जण जखमी झाले. या घटनेचे वृत्त समजताच सर्व परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

माहितीनुसार, धुळे शहरानजीकच्या चित्तोड या गावात ही घटना घडली. येथील एकलव्य मित्र मंडळाने गणपती विसर्जनाची मिरवणूक आयोजित केली होती. मिरवणुकीत मोठ्या संख्येने मंडळाचे कार्यकर्त व भाविक सहभगी झाले होते. डीजेच्या तालावर सर्व नाचत होते. त्याचवेळी एका दारूच्या नशेत असलेल्या चालकाने अचानकपणे टॅक्टर सुरू केला आणि त्याचवेळी ती लहान बालके टॅक्टरखाली आले. यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. परी बागुल (वय १३), शेरा सोनावणे (वय ६), लड्डू पावरा (वय ३) अशी मृतांची नावे आहेत.

logo
marathi.freepressjournal.in