मुंबई पोलीस दलात बदल्या; तीन एसीपी, २७ पोलीस निरीक्षक २६ एपीआय, तर ११८ उपनिरीक्षकांचा समावेश

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार, मंगळवारी मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे.
मुंबई पोलीस दलात बदल्या; तीन एसीपी, २७ पोलीस निरीक्षक २६ एपीआय, तर ११८ उपनिरीक्षकांचा समावेश

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार, मंगळवारी मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. त्यात तीन एसीपी, अकरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक, २७ पोलीस निरीक्षक, २६ सहाय्यक पोलीस निरीक्षक तर ११८ पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. २३ पोलीस निरीक्षकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बढती देऊन त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दया नायक, सुधीर दळवी, जयवंत सकपाळ यांचा समावेश आहे.

एप्रिल महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मंगळवारी काही पोलीस अधिकाऱ्यांना अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. त्यात सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक मेर यांची मेघवाडी येथून गावदेवी विभागात, संपत पाटील यांची मीरा -भाईंदर-वसई-विरार येथून मेघवाडी विभागात, प्राची कर्णे यांची महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथून विशेष शाखा एक बदली करण्यात आहे.

२३ पोलीस निरीक्षकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बढती देताना त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दया नायक यांची गुन्हे शाखेत, प्रकाश बागुल यांची आर्थिक गुन्हे शाखेतून आर्थिक गुन्हे शाखा, सुप्रिया मलशेट्टी यांची पवईतून विशेष शाखा एक, रेहमतउल्ला सय्यद यांची धारावी येथून कक्ष दहा, संभाजी जाधव यांची संरक्षण व सुरक्षा विभागातून वाहतूक विभाग, अनिल ठाकरे यांी विशेष शाखेतून विशेष शाखा, रवींद्र पडवळ यांची चारकोप येथून कक्ष दहा, दिलीप देशमुख यांची विशेष शाखेत, दिवाकर सावंत यांची संरक्षण व सुरक्षा विभाग, पंढरीनाथ पाटील यांची गुन्हे शाखा, जगदीश कुलकर्णी यांची आर्थिक गुन्हे शाखा, मंजुषा परब यांची भायखळा पोलीस ठाणे, सुधीर दळवी गुन्हे शाखा, महेश निवतकर यांची विशेष शाखा एक, प्रतिभा मुळे यांची विशेष शाखा एक, सागर शिवलकर यांची शाहूनगर येथून संरक्षण व सुरक्षा विभाग, सचिन कदम यांची नागपाडा येथून आर्थिक गुन्हे शाखा, जयवंत सकपाळ नवघर येथून वाहतूक विभाग, दिपक दळवी यांची आर्थिक गुन्हे शाखा, सुधाकर खांडेकर यांची संरक्षण व सुरक्षा विभााग, अजय जोशी यांची आर्थिक गुन्हे शाखेतून मुलुंड पोलीस ठाणे, इरफान शेख यांची जोगेश्‍वरी येथून दिडोंशी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

अन्य २७ पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. त्यात चेतन राठोड यांची मलबार हिल-डी. एन नगर, सचिन माने यांची शिवडी-नेहरुनगर, नितीन महाडिक यांची डी. बी मार्ग- टिळकनगर, अमोल ताम्के यांची ताडदेव-नवघर, सचिन जाधव यांची गावदेवी-विक्रोळी, गणेश आंधे यांची डी. एन नगर-मलबार हिल, ज्ञानेश्वर गावशेट्टे यांची आरसीएफ-नवघर, सोमेश्वर खटपे देव-विक्रोळी, संतोष खाडेकर मालाड-वाकोला, संदीप वेदपाठक यांची गोरेगाव-धारावी, दत्तात्रय धुमे यांची साकिनका-ट्रॉम्बे, विजय दळवी यांची पवई-गोरेगाव, संजय पवार यांची बीकेसी-व्ही पी रोड, धनश्याम पाटील, किशोर साळवी यांची नागपाडा व नवघर येथून विशेष शाखा, शेशराव शेळके यांची वाकोला विशेष शाखा एक, मोहीनी लोखंडे गुन्हे शाखा-व्ही. पी रोड, संजय पुजारी यांची पूर्व नियंत्रण कक्ष-धारावी, महेंद्र जाधव यांची गुन्हे शाखा-कस्तुरबा मार्ग, प्रमोदकुमार कोकाटे यांची गोवंडी-मुलुंड, विलास भोसले यांची गुन्हे शाखा-डी. बी मार्ग, बाळकृष्ण घाडीगावकर यांची कुर्ला-एल. टी मार्ग, विजय जाधव यांची पाईसाईट-डी. बी मार्ग, संजय पवार यांची आर्थिक गुन्हे शाखा-सहार, मंगेश देसाई यांची उत्तर सायबर-गोरेगाव, निलिमा कुलकर्णी यांची कक्ष दहा-आझाद मैदान, चंद्रकांत चौधरी यांची कक्ष दहा-दादर आणि मनोजसिंह चौव्हाण यांची मुख्य नियंत्रण कक्षातून नवघर पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. तसेच २६ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि ११८ पोलीस उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत.

‘या’ ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

११ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आहेत. त्यात भगवत गरांडे यांची एअरपोर्टहून ॲण्टॉप हिल पोलीस ठाणे, मिलिंद कुरडे यांची डी. एन. नगर येथून संरक्षण व सुरक्षा विभाग, नंदकुमार गोपाळे यांची भायखळा येथून गुन्हे शाखा, जीवन खरात यांची दिडोंशी येथून संरक्षण व सुरक्षा विभाग, संदीप विश्वासराव यांची कांदिवली येथून कफ परेड पोलीस ठाणे, राजेंद्र मच्छिंद्र यांची कफ परेड येथून डी. एन नगर पोलीस ठाणे, ज्ञानेश्वर गणोरे यांची गुन्हे शाखेतून कांदिवली पोलीस ठाणे, मधुकर सानप यांची सशस्त्र पोलीस दलातून विमानतळ पोलीस ठाणे, कांतीलाल कोथिंबीरे यांची मुलुंड येथून पूर्व नियंत्रण कक्ष, संजीव तावडे यांची सशस्त्र पोलीस दलातून वाहतूक विभाग, नितीन पोतदार यांची आर्थिक गुन्हे शाखेतून अंमलबजावणी विभागात बदली करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in