राज्यातील १४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नागपूरच्या नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांची मुंबईच्या पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली
राज्यातील १४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य पोलीस दलातील पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त-पोलीस उपअधीक्षकाच्या गुरुवारी बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.

नागपूरच्या नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांची मुंबईच्या पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्यासह नागपूरचे दहशतवाद विरोधी पथकाचे उपअधीक्षक विद्याशंकर दुर्गाप्रसाद मिश्रा यांची नागपूरच्या नक्षल विरोधी अभियान-विशेष कृती दलाच्या उपअधिक्षक, अमराती ग्रामीणचे उपविभागीय अधिकारी शिवलाल शंकरराव भगत यांची चंदूरच्या उपविभागीय अधिकारी, नाशिकचे सहाय्यक आयुक्त राजीव धुराजी नवले यांची सातार्‍याच्या उपविभागीय अधिकारी, नांदेडचे उपविभागीय अधिकारी विजय पांडुरंग लगारे यांची मीरा-भाईंदर- वसई-विरारच्या सहाय्यक आयुक्त, सांगली मुख्यालयाचे उपअधीक्षक डॅनियल जॉन बेन यांची नांदेडच्या उपविभागीय अधिकारी, चंद्रपूरच्या उपविभागीय अधिकारी साहिल उमाकांत झरकर यांची गोंदिया येथील उपविभागीय अधिकारी, रत्नागिरीच्या उपविभागीय अधिकारी सोनाली तुकाराम कदम यांची सातारा ग्रामीणच्या उपविभागीय अधिकारी, साताऱ्‍याचे उपविभागीय अधिकारी मयुर सिद्राम भुजबळ यांची मुंबईच्या सहाय्यक आयुक्त, सातारा ग्रामीणचे उपविभागीय अधिकारी सुहास त्रिंबकराव शिंदे यांची गडचिरोली उपविभागीय अधिकारी, दौंडच्या प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य कल्पना सुनील बारवकर यांची अमरावतीच्या उपायुक्त, नागपूरचे सहाय्यक आयुक्त प्रवीण विनायक तेजाळे यांची मुंबईच्या आयुक्त, सांगलीचे गुन्हे शाखेचे उपअधीक्षक राजन हिंदुराव सस्ते यांची रत्नागिरीच्या उपविभागीय अधिकारी, नवी मुंबईचे सहाय्यक आयुक्त गजानन तुळशीराम राठोड यांची महाराष्ट्र राज्य लाचलुचपत विभागाच्या अप्पर अधिक्षक येथे बदली करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in