राज्य पोलीस दलातील २१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य पोलीस दलातील २१ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश सोमवारी गृहविभागाकडून जारी करण्यात आले आहे.
राज्य पोलीस दलातील २१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य पोलीस दलातील २१ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश सोमवारी गृहविभागाकडून जारी करण्यात आले आहे. त्यात तीन पोलीस अधीक्षक तर १८ पोलीस उपअधीक्षक-उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांना त्यांच्या नवीन नियुक्त केलेल्या ठिकाणी तातडीने रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे.

सोमवारी गृहविभागाने २१ पोलीस अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या केल्या. त्यात पोलीस महासंचालक कार्यालयाच नियोजन व समन्वय विभागाचे सहाय्यक पोलीस महानिरीक्षक विक्रम साळी यांची अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य, अमरावतीच्या पोलीस उपायुक्त वैशाली माने यांची पुणे महाराष्ट्र राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक, नाशिकच्या नागरी हक्क संक्षणचे पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांची पुण्याच्या राज्य राखीव बलाच्या समादेशक या तीन पोलीस अधीक्षकांचा समावेश आहे. तर इतर उपअधीक्षक-उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांची अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेत अहमदनगर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक संजय बांबळे यांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकदमीच्या पोलीस उपअधीक्षकपदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in