एसटी प्रवाशांची आंबेतला फेरी बोटीतून वाहतूक

रोरो आणि फेरीबोटीतून दररोज ३० फेऱ्या होतात, अशी माहिती दापोलीतील एसटीतील सूत्रांनी दिली
एसटी प्रवाशांची आंबेतला फेरी बोटीतून वाहतूक

ठाणे : रत्नागिरीतील आंबेत पूल गेल्या आठवड्यापासून अवजड वाहतुकीसाठी बंद असल्याने एसटीच्या रत्नागिरी विभागातील दापोली व मंडणगड आगाराच्या बसेसना या पुलावरुन जाण्याची बंदी केली आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवाशांना फेरीबोटीतून घेऊन जाण्याची परवानगी दापोलीतील सुवर्णदूर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना देण्यात आली. रोरो आणि फेरीबोटीतून दररोज ३० फेऱ्या होतात, अशी माहिती दापोलीतील एसटीतील सूत्रांनी दिली.

आंबेत पूल मोठ्या दुरुस्तीमुळे बंद ठेवल्याने ठाणे, बोरिवली आणि मुंबई या मार्गावरील एसटी प्रवाशांवर फेरीबोट आणि रो-रो बोटमधून प्रवास करण्याची वेळ आली आहे. कारण, एसटीच्या रत्नागिरी विभागातील दापोली आणि मंडण आगाराच्या बसगाड्यांनाही बंदी केली. राज्य शासन अधिसूचना ट्रान्स शिपमेंट २३ नुसार महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या लहान बंदरांच्या हद्दीत चालणाऱ्या फेरीबोट आणि रोरो बोटीमधून वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. फेरीबोट आणि बोटीमधून पाळीव प्राणी, वाहने आणि माल इत्यादींनाही परवानगी देण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in