Raigad News : आदिवासी कुटुंबावर हल्ला; नऊ जणांवर गुन्हा, पाच दिवसांची पोलीस कोठडी

रोहा तालुक्यातील भालगाव येथील आदिवासी वाडीतील वाघमारे कुटुंबावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुरूड पोलीस ठाण्यात ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुरुवातीला ६ जणांना अटक करण्यात आली होती, तर उर्वरित ३ आरोपींनाही नंतर ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने सर्वांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुरूड-जंजिरा : रोहा तालुक्यातील भालगाव येथील आदिवासी वाडीतील वाघमारे कुटुंबावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुरूड पोलीस ठाण्यात ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुरुवातीला ६ जणांना अटक करण्यात आली होती, तर उर्वरित ३ आरोपींनाही नंतर ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने सर्वांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

२८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मिठागर येथील ९ जणांनी भालगावच्या आदिवासी वाडीत घुसून वाघमारे कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली.

मंगेश महादेव वाघमारे यांना हाताबुक्यांनी व लाथांनी मारहाण केली तर पत्नी संगिता वाघमारे, मुलगा साहिल, काका चंदर वाघमारे यांनाही मारहाण केल्याने ते जखमी झाले होते.

जखमींना तातडीने मुरूड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी फिर्यादी मंगेश वाघमारे (४२) यांच्या तक्रारीवरून मिठागर येथील दिपेश कृष्णा ठाकुर, विजय विठ्ठल पाटील, परेश कृष्णा ठाकुर, विराज विजय ठाकुर, करण विठोबा चिपकर, सुजय संतोष शहापुरकर, दिपेश दत्ताराम माळी, विनिते विजय ठाकुर आणि सागर पांडुरंग ठाकुर या ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाहोता.

या प्रकरणी रायगड उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांनीही पाहणी करून ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले. या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक परशुराम कांबळे करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in