मला ठार मारायचा प्रयत्न केला - उदय सामंत

ज्यांना माझ्या कुटुंबाचा पुळका आला आहे, त्यांनीच माझ्यावर पुण्यात हल्ला केला. मला ठार मारायचा प्रयत्न केला
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

प्रतिनिधी/मुंबई

आता आमच्या कुटुंबाबददल चांगले बोलले जाते आहे. चार दिवसआधी वाईट बोलले गेले. आमच्या कुटुंबावर टीका केल्यानंतर जनता जेव्हा म्हणते मतदान होणार नाही, तेव्हा आम्हाला चांगले बोलायचे. पण मला या सर्व गोष्टी माहिती आहेत. ज्यांना माझ्या कुटुंबाचा पुळका आला आहे, त्यांनीच माझ्यावर पुण्यात हल्ला केला. मला ठार मारायचा प्रयत्न केला, असा खळबळजनक आरोप राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी केला. मला कोणाच्या सहानुभूतीची गरज नाही. पण हे प्रकार जे कोणी करवून घेत आहेत, त्यांना नियती माफ करणार नाही, असेही सामंत म्हणाले. हे वक्तव्य करताना उदय सामंत यांचा नेमका रोख कोणाकडे होता? हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

कोल्हापूरमध्ये जाऊन गादीचा अपमान कोणी केला हे सांगणार

मी येत्या १ तारखेला कोल्हापूरमध्ये जाऊन पत्रकार परिषद घेणार आहे. गादीचा खरा अपमान कोणी केला, हे मी उघड करणार असल्याचे सांगून उदय सामंत म्हणाले, “संभाजीराजे छत्रपतींना तिकिट नाकारले कोणी. त्यांच्यावर कसा दबाव टाकण्यात आला. माझ्या बंगल्यावर संभाजीराजेंकडून कसे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले. संभाजीराजेंना सांगण्यात आले होते तुम्हाला शिवसेनेत यावे लागेल. आम्ही तुम्हाला शिवसैनिक म्हणून बघतो. छत्रपती म्हणून बघत नाही, हे कोणी म्हटले होते. हे सर्व १ तारखेला कोल्हापूरात सांगणार आहे,” असेही उदय सामंत म्हणाले. बारसूबददल आता अनेक जण बोलायला लागले आहेत. पण नाणार प्रकल्प रद्द झाला, तेव्हा बारसूचीच जागा कशी चांगली आहे, हे पत्र कोणी लिहिले ते पण कोकणातील जनतेला कळले पाहिजे,” असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in