त्र्यंबकेश्वर मंदीर प्रवेश प्रकरण चिघळले, हिंदू महासंघाने केले प्रवेशद्वाराचे शुद्धीकरण

हिंदू महासंघाच्या वतीने मंदीराच्या प्रवेशद्वाराचे शुद्धीकरण करत पुजन करण्यात आले. यावेळी पुणे, नाशिक येथील संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्र्यंबकेश्वर मंदीर प्रवेश प्रकरण चिघळले, हिंदू महासंघाने केले प्रवेशद्वाराचे शुद्धीकरण

नाशिकजवळ असलेले त्र्यंबकेश्वर येथील महादेव मंदीर हे बारा ज्योतीर्लींगांपैकी एक आहे. याठिकाणी देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. काही दिवसांपासून हे मंदीर एका नव्या वादासाठी चर्चेत आले आहे. त्र्यंबकेश्वर येथील मंदीर प्रवेशाचे प्रकरण चांगलेच तापताना दिसत आहे. या प्रकरणी हिंदू महासंघाने आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहण्यास मिळत आहे. आज(17 मे) सकाळी हिंदू महासंघाच्या वतीने मंदीराच्या प्रवेशद्वाराचे शुद्धीकरण करत पुजन करण्यात आले. यावेळी पुणे, नाशिक येथील संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन देखील करण्यात आले.

गेल्या दोन दिवसांपासून या प्रवेश प्रकरणावरुन मोठ्या प्रमाणावर राजकारण तापले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर उरुसाच्या चार आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही दिवसांपुर्वी उरुसाचे आयोजन करणाऱ्यांनी मंदीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मंदीर प्रशासनाकडून करण्यात आला. यानंतर या प्रकरणाने चांगचा पेट घेतला. या प्रकाराचा निषेध नोंदवण्यासाठी आज हिंदू महासंघाने विविध हिंदू संघटनांना एकत्र करत मंदीराच्या प्रवेशद्वाराचे शुद्धीकरण करत पुजन केले. तसेच मंदीर प्रशासन आणि पोलिसांना निवेदन देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली.

नेमके काय आहे प्रकरण...

13 मे रोजी त्र्यंबकेश्वर महादेव मंदीराच्या जवळ असलेल्या दर्ग्यावर संदलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही तरुणांनी धूप दाखवण्याच्या निमित्ताने मंदीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा रक्षकांकडून त्यांना रोखण्यात आले. पोलीस आणि मंदीर प्रशासनाने मध्यस्थीत करत हा वाद मिटवला. मात्र, मंदीर प्रशासनाने घडलेल्या घटनेच्या चौकशीसाठी पोलीस प्रशासनाला पत्र लिहले त्यानंतर हा वाद वाढत गेला.

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मंदीरात कुणीही जबदरस्ती घुसले नाही. तसेच काहीही चुकीचे घडले नसल्याचे ते म्हणाले आहेत. या प्रकरणाची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेतली असून एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर उरुसाच्या चार आयोजकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.

उरुस आयोजकांनी मात्र या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ही अनेक वर्षापासूनची परंपरा असल्याचा दाव उरुस आयोजकांनी केला आहे. उरुसातील सेवेकरी त्र्यंबकेश्वर मंदीराच्या उत्तर दरवाजाच्या पायरीवर डोक्यावर फुलांच्या माळा घेऊन त्र्यंबकेश्वरला भक्तीभावाने धूप दाखवतात. ही प्रथा अनेक वर्षापासून सुरु असल्याचा दावा सलिम शेख यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in