पैठण रोडवर भीषण अपघात, सुसाट ट्रकची १० ते १५ वाहनांना धडक

वाल्मी नाका येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहनांचा वेग कमी होता.
पैठण रोडवर भीषण अपघात, सुसाट ट्रकची १० ते १५ वाहनांना धडक

छत्रपती संभाजीनगर : पैठण रस्त्यावरील वाल्मी नाकाजवळ शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता भीषण अपघात झाला. सोलापूरकडून धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या सुसाट ट्रक वाहतूक खोळंबल्याने थांबलेल्या वाहनांना उडवत गेला. यात जवळपास १० ते १५ पेक्षा अधिक वाहनचालक गंभीर जखमी झाले. याअपघातामुळे रस्त्यावर वाहने, काचांचा ढिग साचला होता.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, वाल्मी नाका येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहनांचा वेग कमी होता. दोन्ही बाजुने वाहने जागेवरच खोळंबली होती. साडेसात वाजेच्या सुमारास सोलापूर- धुळे महामार्गावरून सुसाट ट्रक आला व क्षणात उभ्या वाहनांना धडकला. ट्रकचा वेग इतका भीषण होता की, त्याने एक चारचाकी, दोन टेम्पो, मालवाहू व पाच दुचाकींना उडवले. घटनेची माहिती कळताच स्थानिकांनी धाव घेतली; मात्र, सर्व वाहने एकमेकांमध्ये अडकलेली असल्याने त्यांना काढण्यात बराच वेळ गेला. काही जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी जखमींचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते.

logo
marathi.freepressjournal.in