तुकाराम मुंढे यांची वर्षभरात पुन्हा बदली; राज्यातील सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्याच्या पदुम विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची पुन्हा सचिव पदावरून बदली झाली आहे.
तुकाराम मुंढे यांची वर्षभरात पुन्हा बदली; राज्यातील सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

प्रतिनिधी/मुंबई : राज्याच्या पदुम विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची पुन्हा सचिव पदावरून बदली झाली आहे. मुंढे यांना असंघटित कामगार विभागाच्या आयुक्त पदी नियुक्त करण्यात आले आहे.

राज्याच्या कुटुंब कल्याण, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त म्हणून अमगोथु श्री रंगा नायक यांची नियुक्ती केली आहे. या ठिकाणी असलेले धीरजकुमार यांना नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवले असून केंद्रीय सेवेत प्रतिनियुक्तीवर गेलेल्या व्ही. राधा यांची राज्याच्या कृषी विभागाच्या प्रधान सचिव आणि रणजित कुमार यांची ‘यशदा’च्या अतिरिक्त महासंचालक पदी नियुक्ती केली आहे. वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र वर्धा जिल्हा परिषदेचे सीईओ पद रिक्त ठेवले. राज्याच्या आयटी विभागाच्या संचालक निमी अरोरा यांची सह आयुक्त राज्य कर विभाग मुंबई येथे, तर पाणीपुरवठा विभागाचे उप सचिव अमन मित्तल यांची ‘मित्र’ संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in